वेगवान नाशिक
दोन दिवसांपासून राष्ट्रवादीचे अधिवेशन सुरू असून ते आता संपलय. त्यादरम्यान सरकार कोसळणार असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. त्यामुळे राज्यात नेत्यानेत्यांमध्ये चांगलाच संघर्ष लागल्याचे दिसून येत आहे. एकमेकांवर सारख्या टिका, आरोप- प्रत्यारोप, विधानं वक्तव्य सुरू आहे. अशातच आता आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने शिवसेना संपवली असती असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे.
astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण
मात्र, त्यानंतर आता शिंदे गटाने या प्रश्नाचं पहिल्यांदाच वेगळं उत्तर दिलं असून शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उठाव केला नसता तर राष्ट्रवादीने भाजपसोबत हातमिळवणी केली असती, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे आक्रमक नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे. यामुळे राजकारणातील वातावरण चागलेच तापले असून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
Health जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला होईल हा आजार
दरम्यान मिडियाशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीने यापूर्वीही पहाटेच्या वेळी भाजपसोबत शपथ घेतली होती. सकाळी कोंबडा बांग देतो तशी ती वेळ होती, असा चिमटा काढला आहे. तसेही अधिवेशन संपलंय, पण सरकार कोसळण्याची आम्ही वाट पाहत आहोत. अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली आहे.
तसेच ज्या पद्धतीनं आम्हाला ढाल तलवार चिन्हही मिळालं आहे. आम्ही पक्षांतर केलेलं नाही. जे पक्षांतर करतात त्यांच्यासाठी अजित पवारांचं वक्तव्य असेल असाही चिमटा त्यांनी काढलाय.
सुषमा अंधारे यांना रोखलं, उद्धव ठाकरे यांना कसं रोखणार?