अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार लपविणे गुन्हा, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


वेगवान नाशिक

नवी दिल्ली : गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवला होता. त्यावर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अपिलावर गेल्या दोन दिवसापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या विरोधात महत्वाचा निकाल दिला आहे. त्यामध्ये न्यायालयाने अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत असल्याचे माहिती असूनही ती लपवून ठेवणे, गुन्हा असल्याचं म्हटलं आहे.

astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण

तसेच जर एखाद्याने अस कृत्य केलं तर आरोपीला वाचविण्यासाठी प्रयत्न केला असे मानण्यात येईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
समजा एका वसतिगृहामध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहे आणि असे माहिती असूनही एका डॉक्टरने ती गोष्ट संबंधित यंत्रणांना कळविली नव्हती. याप्रकरणी गेल्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बाजूला ठेवला होता.

त्यामुळे मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या अपिलावर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

Health जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला होईल हा आजार

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *