सीएनजी पीएनजीच्या दरात वाढ


वेगवान नाशिक

सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून सामान्य वर्गाला त्याचा चांगलाच फटका बसताना दिसत आहे. त्यात इंधन कंपन्या सातत्याने आपले दर कमी जास्त करत आहे. अशातच आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला आता पुन्हा झळ बसणार आहे.

astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण

दरम्यान सीएनजीचे दर आता पेट्रोलच्या दरांच्या जवळ पोहोचले असून आठ महिन्यांत सीएनजीच्या दरात ३० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना दुहेरी झटका लागला आहे. याबाबत महानगर गॅस लिमिटेडनं शुक्रवारी किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून हे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. तर सीएनजीच्या दरात ३.५ रूपये प्रति किलोने तर पीएनजीच्या किंमतीत दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच वाढत्या खर्चाचं कारण देत एमजीएलनं ही वाढ केली असल्याचं सांगितल आहे.

Health जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला होईल हा आजार

तर मुंबईत आता सीएनजीमध्ये झालेल्या ३.५ रूपयांच्या वाढीनंतर हे दर ८९.५० रूपयांवर पोहोचले आहेत. त्याचबरोबर १.५ रूपयांच्या वाढीनंतर पीएनजीचे दर वाढून ५४ रूपये प्रति एससीएमवर गेले आहेत. याला कारण कमी पुरवठामुळे हे दर वाढवण्यात आले आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात दरवाढ करत महानगर गॅस लिमिटेडनं मुंबईकरांना झटका दिला होता. गेल्या महिन्यात सीएनजीच्या दरात ६ रुपये प्रति किलोनं वाढ करण्यात आली होती. तर पीएनजीच्या दरात ४ रूपये प्रति एससीएमनं वाढ केली होती.

मोठी बातमीः राष्ट्रवादीचे 12 आमदार फुटले, कार्यक्रम ओके

तसेच  एपीएमनं गॅसच्या पुरवठ्यात १० टक्क्यांची कपात केली असून यानंतर मागणी पूर्ण करण्यासाठी अधिक खर्च करून बाहेरून इंधन मागवावं लागत असल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडकडून देण्यात आली आहे.

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *