वेगवान नाशिक
मुंबई : काही दिवसांआधी रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्लॅटफॉर्म तिकिटीत वाढ केली होती.त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. म्हणूनच आता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांकरिता दिलासादायक बातमी दिली आहे. तर मोठ्या रेल्वे स्टेशनांचे वाढलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर प्रशासनेने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
astrosage आजचे राशी भविष्यः तुम्ही आजच सावध व्हा पुढे फार कठीण
तर काही दिवसांपूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटांचे वाढवलेले दर हे अनावश्यक होत असलेली गर्दी रोखण्यासाठी वाढवण्यात आले होते. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने आता हा निर्णय मागे घेतला. तसेच प्लॅटफॉर्मवरील गर्दी रोखण्यासाठी २०१५ साली रेल्वे मॅनेजरकडे रेल्वे प्रशासनाने हे अधिकार दिले होते. पण रेल्वेच्या या नव्या निर्णयामुळे आता डीआरएमला प्लॅटफॉर्म तिकिटांच्या किंमती वाढवता येणार नसल्यामुळे लाखो लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Health जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुम्हाला होईल हा आजार
दरम्यान या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्यामागे विशेष कारण चेन पुलिंगच्या घटना देखील होत्या. कारण एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या घटना घडल्या होत्या. त्यात बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली असल्याने अनेक एक्सप्रेस रेल्वे उशिरा धावल्या. त्यामुळे प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागला आहे.
सुषमा अंधारे यांना रोखलं, उद्धव ठाकरे यांना कसं रोखणार?