वेगवान नाशिक
राज्यात सध्या संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहे. संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यानंतर शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी एका महिला पत्रकाराने त्यांना भेटीत काय झालं, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी आधी तू कुंकू लावून ये, मग मी तुझ्याशी बोलतो, असं वक्तव्य केलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार
यावरून संभाजी भिडे यांच्यावर सोशल मीडियावर टीका सुरु असून, राज्यभरातील महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. तसेच भिडे यांच्याविरोधात महिला काँग्रेसने आंदोलन केलं असून महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
NCPच्या अधिवेशनानंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांचा दावा
त्यानंतर भिडे यांच्या पोस्टरला टिकली लावून महिला कार्यकर्त्यांनी त्यांचा निषेध नोंदवला. प्रत्येक महिला ही भारतमातेचं रुप असून भारतमाता विधवा नाही, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे. महिला आयोगामार्फतही संभाजी भिडे यांना नोटीस बजावण्यात आली असून या वक्तव्यानंतर भिडे यांनी स्वतःची भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्पांवरून अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला