सिन्नर: विक्रीच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक, गावठी कट्टा आणि काडतूस हस्तगत


वेगवान नाशिक
मुसळगाव एमआयडीसी परिसरात गावठी कट्टा व जिवंत काडतूस विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मुसळगाव एमआयडीसी परिसरात विक्री करण्यासाठी घेऊन जात असलेला गावठी कट्टा घेऊन दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या पथकाने एमआयडीसी परिसरात हॉटेल गुलमोहर समोर सापळा रचत दोन संशयतांना शिताफीने ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे रात्री आठ वाजेच्या दरम्यान दोन तरुण सिन्नरहून शिर्डी कडे काळया लाल रंगाच्या बजाज पल्सर मोटरसायकल वर जात असताना आढळून आले. सदर तरुणांना थांबवून त्यांची चौकशी व झाडाझडती केली असता एक दहा हजार रुपये किमतीचे चंदेरी रंगाचे पिस्तूल, एक जिवंत काडतुस मिळून आले.
आतिफ रफिक शेख (वय २३), रा.रोहिदास चौक ,इंदिरानगर ता- वैजापूर आणि आयाज अहमद शेख ( वय २६) रा. खंडोबा नगर, बेळगाव रोड,ता-वैजापूर अशी पकडलेल्या दोघांची नावे आहेत.

या दोघांकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस व दोन मोबाईल, एक मोटरसायकल, एक पावती असा एकूण १लाख ७० हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरचा मुद्देमाल व दोघा संशयित आरोपींची एमआयडीसी पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे ,हवा/ रविंद्र वानखेडे,नवनाथ सानप,विनोद टिळे,हेमंत गिलबिले,प्रदीप बहीरम यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *