NCPच्या अधिवेशनानंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांचा दावा


वेगवान नाशिक

राज्यात सध्या शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार बद्दल वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहे. तसेच आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावर सरकार कोसळू शकेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकार कधी पडणार, याचंच भाकित केलं आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आल आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार

तसेच विरोधकांकडून वारंवार हे सरकार कोसळणार असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, हे सरकार कधी कोसळेल याची तारीख कुणीच सांगितलेली नाही. परंतु, आता राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांनी मोठा दावा केला असून एका नेत्याने तर येणारी कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या नेत्याने तर शिर्डीतील अधिवेशनानंतर राज्यातील सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे.

व्हाट्सएपचं जबरदस्त नवीन फीचर लॉन्च

दरम्यान,  जयंत पाटील यांनी  राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेलं सरकार राष्ट्रवादीच्या या अधिवेशनानंतर पडेल, असं सूचक भाकित केलं आहे. तसेच आपल्याच गावाचा असा पायगुण आहे असं स्वत:च जाहीर करणारे आमचे परमस्नेही खासदार यांचं कौतुक वाटतं, असं म्हणत जयंत पाटलांनी शिर्डीतील विद्यमान खासदारांना टोला लगावला.

त्यानंतर  राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. येणाऱ्या कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

बच्चू कडूंनी केलेल्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *