वेगवान नाशिक
नाशिक : नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात (दि,३) रोजी झालेल्या बैठकीत साडेतीन शक्तीपीठांमध्ये समावेश असलेल्या सप्तशृंगी देवी गडाचा विकास आराखडा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादर करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकार्यांना दिले आहेत. तसेच एका महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी अधिकार्यांना दिले आहेत.
महाराष्ट्राची आठव्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर झेप
तसेच सप्तश्रृंगी गडावर लोकसहभागातून विकासाची स्थळे निश्चित करण्याच्या दृष्टीने उपयायोजना करण्यात याव्या असे सांगण्यात आले आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी काही सुचना केल्या आहेत. जसे की भाविक व पर्यटकांना अत्याधुनिक मुलभूत व पायाभूत सुविधा देण्यादृष्टीने आराखडा तयार व्हावा,
रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना ड्रेनेज लाईनची तोडफोड नको, स्थानिकांची दुकाने एका रांगेत राहतील, याची तरतूद करावी, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी व्यवस्था करावी, तसेच नांदूर ते गडापर्यंतचा ५ किेमीचा रस्ता, गणपती मंदिर ते वणीगड रस्ता, प्रदक्षिणा मार्ग दुरुस्त करा.
मोठी बातमी! शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी- कॅांग्रेसला मोठ खिंडार
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, निवासीजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, जिल्हा आरोग्य अधिकारी कपिल आहेर, कळवण तहसीलदार बंडू कापसे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जून गुंडे, सप्तश्रृंगी निवासिनी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गिते, नियोजन अधिकारी शशांक कामळे, सप्तश्रृंगी गड सरपंच रमेश पवार, वणी ग्रामपालिका सदस्य संदीप बेणके आदी उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील चार चाकीचा नंबर मनाप्रमाणे पाहिजेत का तर हे करा