वेगवान नाशिक
लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर साडेपाच वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी महिला यांच्या मुलीस आरोपी युवकाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले.
दि. 1 जुलै 2017 ते दि. 2 नोव्हेंबर 2022 यादरम्यानच्या काळात आरोपी युवकाने या मुलीला फूस लावून तिला लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यासोबत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केले.
पोलीस पुढील तपास करत आहे.