वेगवान नाशिक
नाशिकः शहरात एक धक्कादायक बातमी समोर आली असून भाजप नेत्याच्या घरावर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार भाजप कामगार आघाडीचे प्रदेश चिटणीस विक्रम नागरे यांच्या घरावर झाला आहे. दरम्यान ही घटना दोन दिवसांपूर्वी झाली असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आत्ता समोर आले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार
याबाबत मिळालेल्या माहितीवरून सातपूर परिसरातील विक्रम नागरे या नेत्याच्या घरावर रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास चाकू, सुरे घेऊन 7 ते 8 जणांच्या घोळक्याने हल्ला केल्याचे म्हटलं जात आहे. तसेच नागरे यांच्या घरावर दगडफेक करत त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न या लोकांना केलायं. मात्र , सुदैवाने सदर नेता घरात उपस्थित नव्हता. त्यामुळे बचावले आहेत.
NCPच्या अधिवेशनानंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांचा दावा
दरम्यान नागरे यांच्या मातोश्रींना धमकावल्यानंतर सदर गुंड निघून गेले, असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आल्यानुसार, या परिसरात सात ते आठ जण काही काळ घिरट्या घालत होते. त्यानंतर त्यांनी रस्त्यावरील दगड उचलून घराकडे फेकले, तसेच परिसरातील जाणाऱ्या नागरिकांना त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही केला आहे.
या प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्पांवरून अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला