वेगवान नाशिक
नाशिक : शहरात सातत्याने काही ना काही घटना घडतानाचं चित्र आहे. त्यात चोरी,मारामारी, दरोडे हल्ले अशा घटना सातत्याने घडत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. अशीच काहीशी घटना घडली असून थेट पोलिस हवालदारावर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार
मिळालेल्या माहितीवरून वाडीवऱ्हे येथील कवटी फाटा पोलीस चौकीच्या मागे हॉटेल ब्रम्हगिरी जवळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश पाटील, निवृत्ती तातडे यांना संशयित आरोपी यांनी आमचे वादात का पडले या कारणावरुन कुरापत काढून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याचं माहितीतून समजते आहे. तर या हल्ल्यात हवालदार योगेश पाटील आणि निवृत्ती तातडे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन या तारखेला होणार लॅांन्च
दरम्यान वाडीवऱ्हे येथे झालेल्या या हल्ल्यात संशयित आरोपी सारंग माळी याने पोलीस हवालदार योगेश पाटील यांच्या डोक्यात कोयत्याने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. त्याचबरोबर निवृत्ती तातडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारत त्यांनाही गंभीर जखमी केले आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे पोलीस हवालदार प्रविण भाऊराव मासुळे यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीसांत गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील तपास सुरू केला असून भा. द.वि कलम ३०७, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून संशयित आरोपी सारंग रंगनाथ माळी, तुषार प्रकाश भागडे, नागेश हरिश्चंद्र भंडारी,पुरुषोत्तम संजय गिरी यांना अटक करण्यात आली आहे.
NCPच्या अधिवेशनानंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांचा दावा