वेगवान नाशिक
मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील उपविभागीय वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने लाकडांची वाहतूक प्रकार घडत असल्याचे समोर आलं आहे. यानरून मालेगाव वन विभागाने वन परिक्षेत्रातून अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार
दरम्यान मंगळवारी (दि. १) चाळीसगाव फाटा येथे एका टेम्पोत (एमएच ०४ एस ३२६८), कुसुंबा रोड येथे (एमएच १८ एम ९१५), सटाणा रोड येथे (एमएच १७ सी ७०२३) व सटाणा रोड बालाजी पेट्रोलपंप येथे (एमएच ०४ सी ९५५२) या चार वाहनांमधून अवैध लाकडू वाहतूक केली जात असल्याचे पथकांना तपासादरम्यान आढळून आले.
त्यापैकी वाहनचालक काला अलीम सैय्यद, अन्सारी अर्शद हुसैन, अन्सारी अहमद सुभान, सईद खान अहमद खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही वाहने जप्त करण्यात आली आहे. तसेच वाहनांची तपासणी केली असता त्यात निंब, जळावू पंच रास, आंबा यांचे लाकूड आढळून आले आहे.
उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांचं उत्तर, म्हणाले..
याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी ही माहिती दिली असून उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनखाली ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. तसेच अवैध लाकडू वाहतूक करणाऱ्यांवर पायबंद घालावा अशी मागणी वनप्रेमींकडून करण्यात आली आहे.
NCPच्या अधिवेशनानंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांचा दावा