वेगवान नाशिक
पंचवटी : NASHIK बहिणीच्या खोलीत शिरल्याचा आणि वाईट नजरेने बघितले म्हणून बांधकाम साईटवरील बांधकाम कारागीर आणि सुरक्षारक्षक यांच्या झालेल्या हाणामारीमध्ये लाकडी दांडा डोक्यात लागल्याने गंभीर जखमी झालेल्या कारागिराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . यातील संशयिताला म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . Killed because he looked at his sister badly!
मेरी पोलीस चौकीच्या मागे असलेल्या इमारतीमध्ये दोन दिवसांपूर्वी संतु उर्फ संजय वसंतराव वायकांडे यांची त्याच्याच काकाने दोन हजार रुपयांसाठी मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असतानाच म्हसरूळ परिसरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि,दिंडोरी रोड परिसरातील वाढणे कॉलनी परिसरातील हनुमान मंदिराजवळील एका बांधकाम साईटवर बांधकाम कारागीर म्हणून सतलाल मुकोरी प्रसाद ४० रा. नहार,छपरा,उत्तरप्रदेश आणि सुरक्षारक्षक म्हणून योगेश पंढरीनाथ डंबाळे २७ रा. ननाशी,ता. दिंडोरी जि. नाशिक हे कामाला होते . गुरुवार दि ३ रोजी सतलाल आणि योगेश हे या दोघांनी रात्री बारा साडेबारा वाजेच्या सुमारास दारू प्यायले . त्यानंतर योगेश डंबाळे याने सतलाल प्रसाद हा आपल्या बहिणीच्या खोलीत शिरला होता म्हणून त्याच्याशी भांडण सुरु केले . यावेळी झालेल्या झटापटीमध्ये योगेश डंबाळे याने लाकडी दांडक्याने सतलाल प्रसाद याला मारहाण केली . यामध्ये एक दांडक्याचा एक टोला सतलाल प्रसाद याच्या डोक्यात लागल्याने तो रक्तभंबाळ होऊन खाली कोसळला आणि त्याच स्थितीमध्ये सकाळ पर्यंत पडून राहिला .
शुक्रवार दि ४ रोजी सकाळी जखमी सतलाल प्रसाद याला आजूबाजूच्या नागरिकांनी बघितले असता याची माहिती म्हसरूळ पोलिसांना दिली . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी सतलाल प्रसाद याला जिल्हा रुगालयात दाखल केले . मात्र रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले . यातील संशयित योगेश डंबाळे याला म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .
ज्या बांधकाम साईटवर हि घटना घडली त्याठिकाणी इतरही कामगार राहत असतात . मात्र,भांडण झाल्यानंतर जखमी सतलाल प्रसाद याला कोणीही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले नाही किंवा याची माहिती पोलिसांना दिली नाही . त्यामुळे रात्रभर मोठ्या प्रमाणात डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला . वेळीच उपचार मिळाले असते तर त्याचा जीव वाचला असता अशी माहिती पोलिसांनी दिली .