भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन या तारखेला होणार लॅांन्च


वेगवान नेटवर्क

नवी दिल्लीः देशात 5G लॅान्च झाल्यापासून अनेक 5G फोन स्वस्तात बाजारात येत आहे.अशातच आता लावा कंपनी आपला सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन ७ नोव्हेंबरला लाँच करणार आहे. दरम्यान लावा ब्लेज ५जी फोनला IMC 2022 (India Mobile Congress) च्या मंचावरून संचार आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सादर केले होते.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार

Lava Blaze 5G किंमत

या फोनला India’s first most affordable 5G smartphone म्हणजेच भारतातील सर्वात स्वस्त ५जी फोन म्हटले गेले आहे. या कंपनीने Blaze 5G च्या किंमतीची खुलासा अजून पर्यंत केला नाही. परंतु, असे मानले जात आहे की, most affordable 5G phone ची किंमत १० हजार ते १३ हजार रुपये दरम्यान असू शकते. तर या फोनची किंमत ७ तारखेला जाहीर केली जाणार आहे.

तसेच या फोनला ब्लू आणि ग्रीन कलर ऑप्शन मध्ये आणले जाणार असून हा फोन अमेझॉन इंडियावर सेलसाठी उपलब्ध केला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस डिस्ले दिला आहे. तसेच या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनेलवर बनवली असून या फोनची स्क्रीन आयपीएस पॅनेलवर बनली आहे. जी ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

Lava Blaze 5G स्पेशिफिकेशन्स

Lava Blaze 5G अँड्रॉयड 12 वर असेल जो २.२ गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडच्या ऑक्टाकोर प्रोसेसर सोबत मिळून काम करतो. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०० चिपसेट आहे. हा फोन ४जीबी रॅम मेमरी सोबत ३ जीबी व्हर्ज्युअल रॅम सपोर्ट करतो. यामुळे ७ जीबी रॅमचे पॉवर मिळते. तसेच या फोनमध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोरेज मिळत असून फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेटअप दिला आहे.

महाराष्ट्रातील प्रकल्पांवरून अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *