उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर फडणवीसांचं उत्तर, म्हणाले..


वेगवान नाशिक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या युतीची चर्चा रंगली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेसोबत युती करण्याची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे दोन्ही नेते लवकरच फोनवरुन चर्चा करणार असून यानंतर निर्णय होण्याची शक्यता  आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार

दरम्यान, याबाबत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संभाव्य युतीवर टीका केली असून आम्ही त्यांचा सामना करु असं म्हटलं आहे. फडणवीस  कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी  पंढरपुरात दाखल झाले तेव्हा त्यावेळी त्यांनी  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विरोधकांच्या राजकारणावर हल्ला चढवला आहे.

NCPच्या अधिवेशनानंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांचा दावा

तसेच  उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे राजकीय युती करणार असल्याच्या हालचाली होत असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले जेव्हा खरोखर हे दोन्ही नेते एकत्र येतील तेव्हा बघू असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर फडणवासांनी म्हटलं की, ते कितीही वेळा एकत्र आले तरी त्यांचा समर्थ मुकाबला करण्यास भाजपा नेहमीच खंबीर असून भाजपा यापुढेही त्याच ताकदीने मुकाबला करणार, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

नाशिकः नाशिक-मुंबई महामार्गावरील टोलवसुली बंद करण्याबाबत सिटीझन्स फोरमची हायकोर्टात मागणी

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *