वेगवान नाशिक
महाराष्ट्रातील सद्यस्थिती पाहता सुरू असलेल्या घडामोडींनी वातावरण चांगलेच संघर्षमय झाले आहे. त्यामुळे राजकारणात सध्या काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे तब्बल 12 नेते फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रायकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार
दरम्यान सर्व नेत्यांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरलेला नसून हे 12 नेते मात्र फुटणार असल्याचं निश्चित झालं आहे. यामध्ये सोलापूरच्या बड्या नेत्याचा समावेश असल्याचा दावा शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना या संबंधित महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्पांवरून अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला
अजित पवार यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना सावधगिरीचा इशारा दिला असून ते आपल्या पक्षातील लोकांना पण आमिष दाखवत आहेत. पण त्यांच्या आश्वासनाला बळी पडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी दिलं आहे.
संभाजी भिडें विरोधात महिला काँग्रेस आक्रमक