महाराष्ट्रातील प्रकल्पांवरून अजित पवारांचा शिंदे फडणवीस सरकारला टोला


वेगवान नाशिक

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात महागाई आणि बेरोजगारी प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातली त्यात राज्यातील  प्रकल्प बाहेर गेल्याने महाराष्ट्रातील तरूण-तरूणींचा रोष वाढला आहे. यावरूनच याचा फटका आपल्याला बसू नये यासाठी, वरचेवर दिखावा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच जर प्रकल्प आमच्या काळात गेला सांगत असाल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पत्र आता का लिहिले, याचेही उत्तर त्यांनी द्यावे, असा टोलाही  अजित पवारांनी  शिंदे-फडणवीस सरकारला लगावला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांच्या जीवनात सुखाचे दिवस येणार

त्यानंतर अजित पवार म्हणाले तुम्ही अनेक प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात आणून भरती करणार आहेत.तर तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा, किती प्रकल्प येणार आहेत आणि किती भरती होणार आहे, याची माहिती द्या, असा तपशील अजित पवार यांनी सरकारडे मागितला आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने (4 ते 5 नोव्हेंबर) शिर्डी येथे राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा हे शिबिर आयोजित करण्यात आले असून यापार्श्वभूमीवर अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेल्याने त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले की, आम्ही पण बरीच वर्षे सरकारमध्ये काम करत आहोत. आर. आर. पाटील असताना आम्ही दरवर्षी 13 हजार पोलिसांची भरती केली होती. त्यानुसार पाच वर्षे एकूण 65 हजार पोलिसांची भरती केली होती. मात्र शिंदे-फडणवीस सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात आणून भरती करणार आहोत तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा, किती प्रकल्प येणार आहेत आणि किती भरती होणार आहे, याची माहिती द्या”, असे अजित पवार यांनी म्हटले.

NCPच्या अधिवेशनानंतर शिंदे -फडणवीस सरकार पडणार, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांचा दावा

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *