वेगवान नाशिक
सध्या आपण पाहतो की प्रत्येकजण मोबाईलवर नवनवीन फिचर्सच्या शोधात असतो. त्यात WhatsApp अनेक नवनवीन फिचर्स आणत असते.अशातच मेटा’ कंपनीचा संस्थापक मार्क झुकरबर्गनं WhatsApp वर नवीन फीचर लॉन्च केलं आहे. चला तर पाहूया काय आहे हे नवीन फीचर.
WhatsApp वर Communities नावाच फीचर लॉन्च केलं असून हे नवं फीचर आजपासूनच ग्लोबल पातळीवर जारी करण्यात आलं आहे.तर ते सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही कालावधी लागणार असून WhatsApp च्या कम्युनिटी फीचरबाबत कंपनीनं या वर्षाच्या सुरुवातीलाच घोषणा केली होती.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
तसेच व्हॉट्सअॅपच्या या कम्युनिटी फीचरच्या माध्यमातून युझर्स ग्रूपमध्ये एकाचवेळी कनेक्ट होऊ शकणार आहेत. म्हणजेच युझर्स आता ग्रूपच्या अंतर्गत निवडक लोकांचा आणखी एक सब-ग्रूप तयार करून त्यांना मेसेज करता येणार आहे.
दरम्यान WhatsApp Communities फीचरच्या माध्यमातून कंपनीनं शाळा, महाविद्यालयं आणि वर्कप्लेसवर लक्ष्य केंद्रीत करू इच्छित आहे. तसेच युझर्सना यात एका मोठ्या ग्रूपमध्येही मल्टीपल ग्रूप कनेक्ट करता येणार आहेत. त्याकरता यूझरला अँड्रॉइड मोबाइलमध्ये चॅटच्या टॉपवर तर ios यूझरला खालच्या बाजूला Communities नावाच्या टॅबवर क्लिक करावं लागेल. इथून युझर Community ला नवा ग्रूप किंवा आधीपासूनच असलेल्या ग्रूपमध्ये सब-ग्रूप तयार करता येणार आहे.
Pmनरेन्द्र मोदींची मोठी घोषणा, महाराष्ट्रात २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर
तसेच या फीचरमुळे युझरला आता वेगवेगळे ग्रूप्स तयार करण्याची गरज नसून एकच मेसेज वेगवेगळ्या ग्रूपवर सेंड करण्याचीही गरज भासणार नाही. आणि तसे युझरला आवश्यक सदस्यांची कम्युनिटी तयार केली की तुम्हाला हवा असलेला ठराविक मेसेज तुम्ही इच्छित असलेल्या ठराविक युझरला पाठवता येणार आहे.
या फिचरमुळे WhatsApp यूझर्स आता एकाचवेळी ३२ सदस्यांसोबत व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत. याशिवाय ग्रूप साइजमध्ये वाढ करुन आता ५१२ वरुन सदस्य संख्या १०२४ इतकी करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या या नेत्याला ईडीचा मोठा झटका, ११ कोटींची मालमत्ता जप्त