ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्हाबाबतची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली


वेगवान नाशिक

राज्याच्या राजकारणात सध्या चिन्हावरून घडामोडी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे दिल्ली उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला मोठा दिलासा दिला असून मशाल चिन्हाबाबत समता पार्टीची याचिका दिल्ली न्यायालयाने फेटाळली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा

दरम्यान ठाकरे गटाला मशाल चिन्हं न देण्याची विनंती समता पार्टीने केली होती. तेव्हा सिंगल जज बेंचने ही याचिका फेटाळल्यावर समता पार्टीन डबल जज बेंचकडे याचिका केली होती. त्यानंतर आता डबल जज बेंचनेही याचिका फेटाळल्यामुळे मशाल चिन्हं ठाकरे गटाचंच यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

गूगलची ही सेवा कायमची होणार बंद

त्यामुळे समता पार्टीने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं स्पष्ट केले आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेला असता तर मुंबईतील पोटनिवडणुकीवर याचा परिणाम होण्याची चर्चा होती. मात्र, न्यायालयाने समता पार्टीची याचिका पुन्हा फेटाळल्याने ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

खुशखबर! सरकारकडून शेतक-यांना P&K खतांसाठी 51,875 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी, स्वस्त दरात मिळणार खत

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *