वेगवान नाशिक
सध्या सुरू असलेल्या टी-20 स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशचा पराभव करून पुरुषांच्या T20 विश्वचषकात एकूण 26 वा विजय नोंदवला आहे. यादरम्यान टीम इंडियाने आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विक्रम मागे टाकला असून टी-20 विश्वचषकात सर्वाधिक विजय नोंदविण्याच्या बाबतीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
यामध्ये पुरुषांच्या T20 विश्वचषकात सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर असून श्रीलंकेने 31 सामने आपल्या नावावर केले आहेत. त्यात आता भारत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर पाकिस्तानचा संघ २५ विजयांसह तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. तर सध्याच्या T20 विश्वचषकात बाबर आझम अँड कंपनीची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. पहिल्या सामन्यात भारताकडून त्याचा पराभव झाला होता तर दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने त्याचा एका धावेने पराभव केला होता.
तसेच विराट कोहलीने बांगलादेशाविरुद्ध 44 चेंडूत नाबाद 64 धावा करून विराट कोहली डेथ ओव्हर्समध्ये भारतासाठी सर्वाधिक चौकार मारणारा फलंदाज ठरला आहे. तर कोहलीने डेथ ओव्हरमध्ये 106 चौकार मारले आहेत तर धोनीने 104 चौकार मारले आहेत. तसेच विराट कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 किंवा त्याहून अधिक धावांच्या एकूण आठ डाव खेळले असून बांगलादेशविरुद्ध त्याने ही कामगिरी केली.
गूगलची ही सेवा कायमची होणार बंद
तर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकणारा विराट कोहली हा खेळाडू आहे. कोहलीला टी-२० विश्वचषकात सात वेळा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले असून या यादीत विंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल (5), महेला जयवर्धने (5) आणि शेन वॉटसन (5) संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.