वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या संकटामुळे राज्यात अनेक भरत्या घेता आल्या नाही. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाचे संकट टळल्याने तरूणांसाठी ब-याच भरती प्रक्रिया घेण्यात येत आहेत. तसेच देशभरात केंद्राच्या वतीने ७५ हजार रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
अशातच पोलिस भरतीसाठी जाहिराती काढल्या असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या आठवड्याभरात साडेअठरा हजार जागांसाठी पोलिस भरतीची जाहिरात निघणार असल्याची माहिती दिली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
याबाबत शासकीय नोकरी मिळालेल्या दोन हजार तरूणांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यावेळी कार्यक्रमा दरम्यान उपमुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले की, आठवड्याभरात साडेअठरा हजार जागांसाठी पोलिस भरतीची जाहिरात निघणार असून महिन्याभरात साडेदहा हजार पदं ग्रामविकास विभागामार्फत भरली जाणार आहेत.
तसेच सर्व विभागांमध्ये भरती प्रक्रियेचं कामकाज सुरु झालेलं असून ही भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी राज्य सरकार विशेष काळजी घेणार आहे. तसेच चांगल्या एजन्सीज् शोधून त्यांना काम दिलं जाईल असंही फडणवीस यांनी सांगितलं आहे. त्यानंतर वर्षभरामध्ये प्रस्तावित जागा भरल्या जातील, असं आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिलं आहे.
गूगलची ही सेवा कायमची होणार बंद