वेगवान नाशिक
महाराष्ट्रातील तरुणांसाठी भविष्यात रोजगाराच्या अधिक जास्त संधी उपलब्ध होतील असा विश्वास मोदींनी व्यक्त केला असून महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार रोजगार देण्याचा देशव्यापी कार्यक्रम राबवण्यात येणार असून हाच कार्यक्रम महाराष्ट्रातही राबवण्यात येत असून त्या अंतर्गत आज पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र देण्यात येत आहेत. तसेच स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत असल्याने तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी, महिलांना समान स्वरुपात उपलब्ध होत असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद, मोदींच्या गुजरात विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजणार
तसेच गेल्या आठ वर्षात ८ कोटी महिला सेल्फ हेल्प ग्रुपशी जोडल्या असल्याने त्यांना साडे पाच लाख कोटींची मदत देण्यात आली आहे. त्यामुळे या ग्रुपशी जोडलेल्या महिला इतर महिलांनाही रोजगार देत असल्याचं मोदींनी सांगितलं.
यासाठी महाराष्ट्रात २ लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असून या प्रकल्पांवर काम सुरु होत आहे. तसेच महाराष्ट्रात रेल्वेसाठी ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती मोदींनी दिली आहे.