वेगवान नाशिक
नाशिक : सध्या जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांच प्रमाण खूप वाढले आहे. वारंवार घडणा-या या घटनांमुळे सर्वसामान्य नाशिककर हैराण झाले आहेत. दरम्यान एकाच दिवसात तीन ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे सापळे टाकले असून तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहे. या अशा घटनांमुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
दरम्यान जिल्ह्यात लाचखोरी वाढली असून शहराच्या पाथर्डी परिसरातील मंडल अधिकारी, सिन्नर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य आणि सूरगाण्यातील उमेदचा अधिकारी असे तिघे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहे. या घटनेमुळे नाशिक जिल्हा लाचखोर अधिकाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी असल्याचे दिसून येत आहे.
Pmनरेन्द्र मोदींची मोठी घोषणा, महाराष्ट्रात २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर
तसेच काही दिवसांपासून लाच प्रकरणाच्या उघडकीस येत असल्याने नागरिक सजग झाले आहे. या प्रकरणातील पहिली कारवाई ही पाथर्डी परिसरातील मंडल अधिकाऱ्यासह खासगी एजंटला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली, तर दुसरी कारवाई ही सिन्नर येथील शासकीय आयटीआय म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यास तीस हजार रुपयांची लाच स्वीकारतांना अटक केली आहे.
त्याचबरोबर लाचलुचपत विभागाचा तिसरा सापळा हा सुरगाणा येथे यशस्वी झाला असून उमेदच्या एका प्रभाग समन्वयकास 12 हजाराची लाच स्वीकारतांना अटक करण्यात आली आहे.
ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्हाबाबतची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली