वेगवान नाशिक
नाशिक : शहरात सध्या सातत्याने आगीचे तांडव पाहायला मिळत आहे. कुठे ना कुठे सारख्या आग लागण्याच्या घटना घडताना दिसताय. अशातच (दि.३) गुरूवारी पहाटेच्या सुमारास शहराला लागून असलेल्या वडनेर-पाथर्डी रस्त्यावरील एका फर्निचर मॉलसह त्याशेजारी असलेल्या भंगार मालाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
मिळालेल्या माहितीवरून, या फर्निचर मॉलमध्ये आठ ते दहा कामगार झोपलेले होते, वेळीच त्यांना जाग आल्याने सुदैवाने ते बाहेर पळाल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या लागलेल्या आगीमध्ये लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच या मॉलजवळ उभी असलेली तीन ते चार वाहने जळून राख झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दहा बंबाच्या साह्याने दोन तास शर्थीचे प्रयत्न करत आग नियंत्रणात आणली आहे.
गूगलची ही सेवा कायमची होणार बंद
दरम्यान या भीषण लागलेल्या आगीमुळे परिसरात धुराचे लोट व ज्वाला पसरल्याने शेजारी असलेले फर्निचर चे मोठे दुकान देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच शहरातील अग्निशमन दल मुख्यालय शिंगाडा तलाव येथील दोन बंब, सिडको, सातपूर, नाशिकरोड, विभागीय केंद्र कोणार्क नगरबया ठिकाणाहून प्रत्येकी दोन तसेच अंबड एमआयडीसी केंद्राचा एक अशा दहा बंबाच्या साह्याने जवानांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली आहे.
तर ही आग शॉर्टसर्किटमुळे किंवा कोणी तरी शेकोटी पेटविल्याने लागली असावी, असा अंदाज वर्तविला जात आहे. तसेच या परिसरात काही दिवसांपासून बस्तान मांडलेल्या व्यावसायिकांनी भंगार मार्केट हटवावे अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.