वेगवान नाशिक
नाशिकः काही दिवसांपासून नाशिक-मुंबई महामार्ग चर्चेत आहे. त्यात दरवर्षी प्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात या महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे नाशिक सिटीझन्स फोरमने उच्च न्यायालयाकडे दाद मागत टोल वसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे.
तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आता हे काम हाती घेतले असले तरी ते होण्यास दोन वर्षे लागतील. या स्थितीत नाशिक-मुंबई प्रवास जिकिरीचा झाला असूनही टोल वसूली मात्र सुरूच आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
त्यामुळे महामार्गावर पडलेले खड्डे बुजवा अन्यथा टोल बंद करण्याचा इशारा देत अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर देखील आंदोलन केले जाईल असा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेत कानउघडणी केलीय. त्यात त्यांनी पंधरा दिवसाच्या आत महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या.
यावरून राजकीय नेत्यांनी नाशिक-मुंबई हा महामार्ग रडारवर घेतलेला असतांना नाशिक सिटीझन फोरमने थेट उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. तसेच या सुनावणी दरम्यान टोल वसूलीला स्थगिती मिळते का ? ज्यांना या याचिकेत पार्टी केले आहेत त्यांच्यावर काही कारवाईचे आदेश निघतात का ? याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
Pmनरेन्द्र मोदींची मोठी घोषणा, महाराष्ट्रात २ लाख कोटींचे प्रकल्प मंजूर