वेगवान नाशिक
नाशिक : शहरात एसबीआय बॅंकेतून १७ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पेठरोडवरील एसबीआय बॅंकेच्या शाखेत घडला असून सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
याबाबत भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे प्रबंधक युवराज दौलत चौधरी (रा. सावरकरनगर, गंगापूर रोड) यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार, एसबीआय बँकेची पेठफाटा येथे शाखा असून (दि२) बुधवारी या शाखेचे कॅशिअर राजेंद्र बोडके यांनी त्यांच्या कॅश काऊंटरमधील जमा केलेली रोख रक्कम मोजून टेबलवर ठेवलेली होती. त्यादरम्यान बँकेत ग्राहक बनून आलेल्या एका भामट्याने बँकेतील कर्मचारी कामकाजात मग्न असल्याचं पाहून टेबलावरील १७ लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार घडला आहे.
गूगलची ही सेवा कायमची होणार बंद
मिळालेली माहिती अशी की, दुपारी दीड वाजेच्या सुमारास बँकेत ग्राहक बनून आलेला संशयित भामटा बँकेच्या परिसरात रेंगाळत होता. तेव्हा त्याने बँकेतील कर्मचारी आपआपल्या कामात गुंग असल्याचे पाहून बोडके यांनी काढून ठेवलेल्या रोकडपैकी १७ लाख रुपयांची रोकड त्यांच्याकडील पिशवीत टाकून तेथून पळून गेला आहे. याबाबत बोडके यांच्या उशिरा लक्षात आल्याने तात्काळ त्यांनी या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
त्यानंतर पंचवटी पोलिस बँकेत दाखल झाले असून बँकेतील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेत पोलिसांनी तपासणी केली असता संशयिताने बँकेतील कर्मचा-यांची नजर चुकवून सदरची रक्कम त्याच्याकडील पिशवीत टाकत असल्याचे कैद झाले आहे.
याप्रकरणी पंचवटी पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक निरीक्षक पडोळकर हे करीत आहेत.
ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्हाबाबतची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली