गूगलची ही सेवा कायमची होणार बंद


वेगवान नाशिक

आपण पाहतो की आज प्रत्येकजण अँड्रॉइड वापरताना दिसतो. त्यात असलेल्या गुगल सेवेमुळे प्रत्येक गोष्ट ही घरबसल्या समजते त्यामुळे गुगलला सगळ्यात जास्त महत्व दिले जातंय. ही सेवा २०१३ पासून सुरू असून ती आता गुगलने कायमची बंद केली आहे.

दरम्यान गुगलने आपली व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट गुगल हँगआउटची सेवा बंद केली आहे. कंपनीच्या या प्लॅटफॉर्मला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे 9 वर्षांच्या अपयशानंतर, कंपनीने गुगल हँगआउट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा

त्यामुळे आता अँड्रॉइड आणि आयओएस वर हे विनामूल्य अॅप वापरता येणार नाही. तसेच गुग क्रोमवरही याचा वापर करता येणार नाही.
त्यात Google Stadia, YouTube Originals, Google+, Google Allo आणि Google Play Music सारख्या सेवांमध्ये आता गुगुल हॅंगआउटचाही समावेश करण्यात आला आहे.

तसेच 2022 च्या सुरुवातीला गुगलने अधिकृतपणे अँड्रॉइड  आणि आयओएस  युजर्ससाठी हॅंगआउटची सेवा बंद करणे सुरू केले होते. त्यानंतर जुलैमध्ये अँड्रॉइड आणि आयओएसवरुन ही सेवा पूर्णपणे बंद झाली. त्यात जर  तुम्हाला गुगल हँगआऊटवरुन तुमचा डेटा परत मिळवायचा असेल तर तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्याकरता तुम्ही फक्त 1 जानेवारी 2023 पर्यंतच तुमचा डेटा डाउनलोड करू शकता.

खुशखबर! सरकारकडून शेतक-यांना P&K खतांसाठी 51,875 कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी, स्वस्त दरात मिळणार खत

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *