वेगवान नाशिक
नवी दिल्ली: या महिन्यात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. गेल्या महिन्यात सरकारने महागाई भत्त्यात ४%ची वाढ केली. त्यानंतर महागाई भत्त्यात झालेल्या वाढीनंतर आता पुन्हा केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना त्यांच्या खात्यात प्रलंबित थकबाकी मिळण्याची आशा आहे.
राज्यात एवढ्या हजार पदांसाठी पोलीस भरती
दरम्यान जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीतील १८ महिन्यांच्या डीए थकबाकी भरण्याबाबतचा मुद्दा मंत्रिमंडळाच्या चर्चेसाठी आणि विचारविनिमयासाठी प्रलंबित आहे. मात्र, सरकार थकबाकी भरण्यास सहमती देईल की नाही, यावर अद्याप कोणतीही स्पष्टता नाही.
तसेच केंद्रीय कर्मचार्यांना जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीतील तीन हप्त्यांचे थकित डीआर मिळालेले नाहीत. त्यात करोना संसर्गामुळे सरकारने डीए जमा करण्यास बंद होता पण सरकारने जुलै २०२१ पासून डीए वाढवला असून १८ महिन्यांच्या डीएसाठी सरकारने अजून पर्यंत एकही पैसा दिलेला नाही.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
किती रक्कम मिळणार
यामध्ये कर्मचा-यांना लेव्हल १ कर्मचार्यांची डीए थकबाकी रुपये ११,८८० ते ३७,००० रुपये असेल. तर स्तर १३ कर्मचाऱ्यांना १,४४,२०० ते २,१८,२०० रुपये महागाई भत्ता थकबाकी म्हणून दिला जाऊ शकतो. मात्र, या रकमेवर सरकार चर्चा करू शकते. मात्र, १.५० लाख रुपये देऊन सरकार तोडगा काढू शकते, असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात खूप पैसा जमा होईल. त्यामुळे डीएची थकबाकी लवकरच मिळेल, अशी सरकारी कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.
ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्हाबाबतची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली