वेगवान नाशिक
नवी दिल्लीः सध्या विधानसा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं असून, आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
गेल्या २५ वर्षांपासून गुजरातवर गेल्या भाजपाची सत्ता आहे. त्यात सध्या झालेल्या मोरबी पूल दुर्घटनेमुळे सत्ताधाऱ्यांना विरोधकांकडून घेरलं जात आहे. तसेच याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने १४ ऑक्टोबरला हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र आयोगानं गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत.
दरम्यान या विधानसभेची मुदत १८ फेब्रुवारी २०२३ मध्ये संपत असून त्यात १८२ सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत १११ आमदार भाजपाचे आहेत. शिवाय काँग्रेसचे ६२ आमदार आहेत. तसेच हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या एकत्रच तारखा जाहीर होऊन मतदान होत असतं. परंतु या परंपरेला यावर्षी आळा देण्यात आला आहे.
त्यामुळे हि निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पावरून ठाकरे गटाचं शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र