वेगवान नाशिक
मुंबई: राज्यात बच्चू कडू आणि रवी राण यांच्यात सुरू असलेल्या वादाने वातावरण चांगलच मेटाकुटीला गेलं आहे. या वादानंतर आता बच्चू कडू भाजप आणि शिंदे गटालाही धक्का देण्याच्या तयारी आहेत. बच्चू कडू यांनी म्हटलं की येणाऱ्या निवडणुकीत आमची युती कुणाशीही होऊ शकते, असं मोठं विधान केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या या विधानाने अनेक तर्कवितर्क लढवले जात असून कडू यांनी हे मोठं राजकीय विधान करून खळबळ उडवून दिली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
ते म्हणाले, आगामी निवडणुकीती किती जागा लढवायच्या याचा अभ्यास आम्ही सहा महिने करत असल्यामुळे 10 ते 15 जागांवर आम्ही लढण्याच्या तयारीत आहोत. तसेच आम्ही लढणार याची भीती भाजपलाच नसून, ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही असू शकते, असं बच्चू कडू म्हणाले आहे.
ठाकरे गटाला मोठा दिलासा, मशाल चिन्हाबाबतची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली
त्यानंतर आमची युतीही होऊ शकते. आमची कुणाही सोबत युती होऊ शकते. हे कुठे स्थिर राहतील का? पाच वर्षाचं राजकारण पाहिलं तर सत्तेत कोणता पक्ष नव्हता असं काही सांगता येत नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसेच सध्या आमची बांधिलकी शिंदे गट आणि भाजप सोबत आहे. त्यामुळे झुकतं माप शिंदे गट आणि भाजपलाच राहील. यांच्यासोबत राहिलो तर यांच्यासोबत राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
गूगलची ही सेवा कायमची होणार बंद