वेगवान नाशिक
राज्यात सध्या राजकारण चांगलेच पेटल्याचं चित्र दिसत असून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद पुन्हा पेटला असल्याच दिसत आहे. या वादात रवी राणा यांनी बच्चू कडूंना धमकी देणाऱ्यांना घरात घुसून मारू’ असा इशारा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चिघळले आहे.
यावर आक्रमक होत बच्चू कडू यांनी ‘कोणत्या चौकात थांबू’, असे प्रत्युत्तर राणांना दिलं आहे. त्यानंतर शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी ‘लढतीचा आनंद’ घेत असल्याची प्रतिक्रिया देत फोडणी कोण घालते, म्हणत टोला लगावला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी क्रोधावर नियंत्रण ठेवा
दरम्यान अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बच्चू कडू आणि रवी राणांच्या वादावर विचारण्यात आले असता, “या प्रकरणावर आम्ही बोलणं उचीत होणार नाही. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असून, दोघे एकमेकांना बघून घेतील.असं आव्हान दिलं आहे.
गूगलची ही सेवा कायमची होणार बंद
तसेच आम्ही प्रेक्षक असून, लढतीचा आनंद आम्ही घेत आहे. या वादाला फोडणी कोण घालत आहे, हे तपासण्याची गरज आहे,” अशी शंकाही परब यांनी उपस्थित केली. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ‘मशाल चिन्हा’विरोधात समता पक्षाची याचिका दुसऱ्यांदा फेटाळल्याने यावरही अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “निवडणूक आयोगाने विचार करुन शिवसेनेला ‘धगधगती मशाल’ चिन्ह दिलं होतं. आम्हाला तीन पर्याय दिले होते, त्यातील ‘धगधगती मशाल’ चिन्ह आम्ही घेतलं आहे, असेही परब यांनी स्पष्ट केलं आहे.