वेगवान नाशिक
सध्या देशातील व्हीआयपी इंडस्ट्रीज ही सर्वात मोठी कंपनी असून गुंतवणुकदारांसाठी ही कंपनी मल्टीबॅगर ठरली आहे. या कंपनीने फक्त 50,000 रुपयांच्या गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवले आहे. तसेच व्हीआयपी इंडस्ट्रीजने केवळ लाँग टर्म नाही तर शॉर्ट टर्ममध्येही गुंतवणुकदारांना मजबूत परतावा दिला आहे. त्यामुळे पाच महिन्यांत त्याचे शेअर्स सुमारे 27 टक्क्यांनी वाढले आहेत.
astrosage आजचे राशी भविष्यः या लोकांनी काड्या करणा-यापासून सावधान
दरम्यान 1 नोव्हेंबर 2002 रोजी व्हीआयपीचे शेअर्स 3.61 रुपयांवर होते, जे आता 731.45 रुपयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळेच त्यावेळी या कंपनीत गुंतवलेले 50,000 रुपये 203 पटीने वाढून 1.01 कोटी रुपये झाले आहेत.
याआधी व्हीआयपीच्या शेअर्सची किंमत 29 नोव्हेंबर 2021 रोजी 494.25 रुपये होती, जी एका वर्षातील विक्रमी नीचांकी असून त्यानंतर, व्हीआयपी शेअर्समध्ये खरेदी वाढली आणि 31 मार्च 2022 पर्यंत ती 57 टक्क्यांनी वाढून 774.50 रुपयांवर पोहोचली, जी 52 आठवड्यांचा विक्रमी उच्चांक आहे. त्यामुळे आता या शेअरमध्ये खरेदी करण्याची चांगली संधी असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
नाशिक- पुणे रस्त्यावर धावणारी संपूर्ण बस जळून खाक
तसेच 2022-23 च्या जुलै-सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 82.83 कोटी रुपयांवरून 32.22 कोटी रुपयांवर घसरला आहे. त्याच वेळी, कंपनीचा महसूलही याच कालावधीत 563.23 कोटी रुपयांवरून 502.68 कोटी रुपयांवर घसरला.
तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार येणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापटचं मोठ विधान