राज्यातून बाहेर गेलेल्या प्रकल्पावरून ठाकरे गटाचं शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र


वेगवान नाशिक

सध्या राज्यातील अनेक प्रकल्प बाहेर जात असल्यने या प्रकल्पांवरून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार टीकास्त्र सुरू असल्याचं दिसत आहे. त्यात वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन यांसारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने शिवसेना आक्रमकपणे शिंदे-भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत आहे.

astrosage आजचे राशी भविष्यः या लोकांनी काड्या करणा-यापासून सावधान

मिळालेल्या माहितीनुसार, वेदांता प्रकल्प राज्यात राहावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले नसून,त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार राज्यात आल्यानंतर वेदांता प्रकल्पासाठी बैठक झाली. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या दिरंगाईमुळेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेला, अशी माहिती MIDCकडून दाखल करण्यात आलेल्या माहिती अधिकाराच्या अर्जात देण्यात आली.

आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप नोंदवला असून या प्रकल्पाबाबत माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलेली माहिती चुकीची आणि खोटी आहे असं म्हटलंय. तसेच सकाळी केलेला  अर्ज आणि संध्याकाळी माहिती समोर येते, त्यामुळे यातील माहिती बनावट असल्याचा दावा अंबादास दानवेंनी केला आहे.

दरम्यान, सध्याच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता प्रकल्पासह अन्य प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार जबाबदार असून, चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे याला प्रत्युत्तर म्हणून आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे सर्व मुद्दे खोडून काढले आहेत.

या शेअर्सने गुंतवणुकदारांचे ५० हजार रूपयांचे झाले एक कोटी


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *