वेगवान नेटवर्क
भारतीय शेअर बाजारात गेल्या चार दिवसांच्या तेजीनंतर आज पाचव्या दिवशी लाल चिन्हावर बाजार बंद झाला आहे. त्यामुळे आज भारतीय बाजारांची सुरुवात निराशजनक झाली होती. त्यामध्ये BSE सेन्सेक्स 215 अंकांच्या घसरणीसह आणि निफ्टी 62 अंकांच्या घसरणीसह बंद झाला आहे.
astrosage आजचे राशी भविष्यः या लोकांनी काड्या करणा-यापासून सावधान
दरम्यान BSE चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स आज 215.26 अंकांनी म्हणजेच 0.36 टक्क्यांच्या घसरणीसह 60,906.09 वर बंद झाला. तर दुसरीकडे, NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 62.55 अंकांच्या म्हणजेच 0.34 टक्क्यांच्या घसरणीसह 18,082.85 च्या पातळीवर बंद झाला.
यूएस फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीपूर्वी भारतीय शेअर बाजार घसरला असून चलनवाढ नियंत्रित करण्याच्या उद्देशाने यूएस फेड आणखी एक मोठा निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात असून भारतीत शेअर बाजार घसरला असल्याचे तज्ञांचे मत आहे. तसेच सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 9 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 15 शेअर्स वाढले तर 35 शेअर्स घसरणीसह बंद झाले.
या शेअर्सने गुंतवणुकदारांचे ५० हजार रूपयांचे झाले एक कोटी