लव्ह जिहादविरोधात नितेश राणेंचं आक्रमक वक्तव्य, म्हणाले…


वेगवान नाशिक

लव्ह जिहादविरोधात हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला त्यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे आक्रमक झाले असून त्यांनी “चुलीत जाऊ द्या आमदारकी, डब्यात जाऊ द्या ती खासदारकी, कोण मोजत नाही,” असं वक्तव्य केलं आहे. त्यानंतर यावेळी बोलताना राणे म्हणाले, मी मरताना ते आमदार पद लागणार नाही. मी मरताना एक हिंदू मेला असं ते लोक सांगणार आहेत, असं कोल्हापुरात मोर्चेवेळी म्हणाले आहेत.

astrosage आजचे राशी भविष्यः या लोकांनी काड्या करणा-यापासून सावधान

यानंतर राणे म्हणाले, “मुस्लिमांना आंदोलन करण्याची वेळ आली अशी एक घटना दाखवा. त्यांच्या कोणत्याही व्यक्तिकडे किंवा धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर ते त्याला जीवंत ठेवत नाही. अशी असंख्या उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो म्हटलं आहे.

तसेच नगरमध्ये एका हिंदू मुलाने एका मुस्लीम तरुणीशी लग्न केलं. तेव्हा तिकडच्या सर्व मुस्लिमांनी एकत्र येऊन त्या मुलाला ठेचून काढलं. कारण तो मुलगा हिंदू होता. ते लोक धरणं देत धरणं देत बसली नाही. घरात माता-भगिणी सुरक्षित नसतील तर तुम्हाला जय श्रीराम म्हणण्याचा आणि भगव गमछा घालण्याचा काय अधिकार आहे?” असा सवाल राणेंनी विचारला.

तर राज्यात पुन्हा महाविकास आघाडी सरकार येणार? घटनातज्ज्ञ उल्हास बापटचं मोठ विधान

त्यानंतर नितेश राणे पुढे म्हणाले, मी सगळ्या पोलीस खात्याला दोष देत नसून, त्यात काही मोजके जे नालायक आहेत त्यांना तर शिक्षा मिळणारच हा शब्द मी तुम्हाला देतो. तसेच आज राज्यात हिंदुत्वाच्या विचाराचं सरकार आहे. आज राज्याचा अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक नाही, हसन मुश्रीफ मंत्री नाही, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नाही. हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा सत्कार व्हायला हे मविआ सरकार नाही. त्यामुळे तुम्ही काहीच चिंता करू नका. फक्त हिंदू समाज म्हणून भीती निर्माण करणं गरजेचं आहे,असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

नाशिक- पुणे रस्त्यावर धावणारी संपूर्ण बस जळून खाक

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *