वेगवान नाशिक
नाशिक : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून २०२३ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक घोषित करण्यात आले असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती आयोगाचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली आहे.
astrosage आजचे राशी भविष्यः या लोकांनी काड्या करणा-यापासून सावधान
आयोगामार्फत शासन विविध पदांकरिता वर्षभर विविध परिक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार २०२३ मध्ये घेण्यात येणा-या परिक्षांचे वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले आहे.
या शेअर्सने गुंतवणुकदारांचे ५० हजार रूपयांचे झाले एक कोटी
याबाबत प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करतांना संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठे, परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत व उमेदवारांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येत असते. तरीपण संबंधित संस्थानी परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत याची दक्षता घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.
नाशिक- पुणे रस्त्यावर धावणारी संपूर्ण बस जळून खाक