नाशिकः नाशिक- पुणे महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात


वेगवान नाशिक

सिन्नर : नाशिक पुणे महामार्गावर शिवशाही बस पेटल्याची घटना घडली असून ही घटना सकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर जवळील माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात घडली आहे.

astrosage आजचे राशी भविष्यः या लोकांनी काड्या करणा-यापासून सावधान

दरम्यान माहितीनुसार, नाशिकहून सकाळी सात वाजेच्या सुमारास प्रवासी घेऊन शिवशाही बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. त्यादरम्यान बस सिन्नर येथे थांबल्यानंतर ती पुढे संगमनेरच्या दिशेने मार्गस्थ झाली असता माळवाडी (शिवाजीनगर) शिवारात अचानक बसमधून धूर निघू लागल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून  सर्व प्रवास्यांना बस मधून खाली उतरले.

आता होणार वर्षातून चार वेळा मतदार नोंदणी

त्यानंतर क्षणार्धात बस पेटली व जळून खाक झाल्याने बसमधून आगेच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या.  मात्र चालकाने प्रवास्यांना बसमधून उतरवल्याने सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहे. परंतु बस जळाल्याने  बसने  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सदर घटनेतील लागलेली आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस स्टेशन आणि निवासस्थान बांधकामांसाठी आवश्यक निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *