नाशिक- पुणे रस्त्यावर धावणारी संपूर्ण बस जळून खाक


वेगवान नाशिक / प्रकाश शेळके

मुंबईः  नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात म्हाळोबा फाट्या नजीक बुधवार सकाळी आठ तीस वाजे दरम्यान शिवशाही बस क्रमांक एम एच 06BW 0640 या बसने अचानकपणे मागील बाजूने पेट घेतला ही बाब चालक अमित वासुदेव खेडेकर वय वर्ष 40 यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित बस जागेवर थांबून आतील प्रवाशांना सामानासह बाहेर उतरविण्यात यश मिळविले सदरच्या प्रवासी बसमध्ये 43 प्रवासी हे प्रवास करत होते सदरची बस ही पिंपरी चिंचवड डेपोची असून सदरचे चालक वाहक यांच्याबरोबर संपूर्ण प्रवासी ग्रुप असून कुणालाही काही इजा झाली नाही.

सदरच्या घटनेची परिस्थिती बघितली असता परिस्थिती अवघड असल्याचे दिसून आले सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे प्रवासी वर्गाने सुटकेचा श्वास सोडला

सदरच्या बसने इतक्या मोठ्या प्रमाणावर आगीचे रुद्र रूप धारण केले होते की परिसरामध्ये सर्वत्र दूर व आगीचे लोड दिसून येत होते या मार्गावरून जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प करण्यात आली होती यासाठी महामार्ग पोलीस नांदूर पोलीस ॲम्बुलन्स सुविधा सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सहकार्य केले सिन्नर येथील नगरपालिकेचे अग्निशमन केंद्राने व एमआयडीसी येथील अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित या ठिकाणी धाव घेऊन बचाव कार्य हाती घेतले मात्र सर्व प्रवाशांना सुखरूप काढून आपापल्या मार्गाने त्यांना पुढील प्रवासासाठी सोडण्यात आले

सुदैवाने यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी न झाल्यामुळे प्रवासी वर्ग मोठ्या उत्साहाने सांगत होता की आमचे योग चांगले होते म्हणून मला काही झाले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या ठिकाणी सर्व परिसरांमधून शेतकरी वर्गाने आग विसरण्यासाठी प्रयत्न केले मात्र आजीने हॅलो रुद्ररूप धारण केल्यामुळे शेवटी सर्वच बस जळून खाक झाली होती बस मधील शितल वगैरे काही शिल्लक नसल्याची बाब समोर आली या घटनेमुळे या परिसरामध्ये हे प्रकार वाढतच असून शिवशाही बसने प्रवास करणे प्रवासी वर्गाला आता धोक्याची वाटू लागली आहे वेळोवेळी करणाऱ्या या प्रकारामुळे शिवशाहीने आपल्या बस बाबत शक्य होईल तेवढी काळजी घेण्याची गरज असल्याचे समोर आले


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *