वेगवान नाशिक
बाजारात आज गॅप अपने सुरुवात झाली आहे. बाजार सुरू होताच आज निफ्टीने 18 हजार अंकांचा टप्पा ओलांडला.
सोमवारीदेखील बाजारात तेजी दिसून आली होती. hare Market Opening Bell: शेअर बाजारात आजही खरेदीचा जोर दिसून येत आहे. बँक निफ्टीत (Bank Nifty) तेजी दिसून येत असल्याने बाजार वधारला आहे.
आज शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 318.99 अंकांनी वधारत 61,065.58 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी (Nifty) 118.50 अंकांनी वधारत 18,130.70 अंकांवर खुला झाला.
सकाळी 9.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स निर्देशांक 338 अंकांनी वधारत 61,084.63 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 108 अंकांनी वधारत 18,120.45 अंकांवर व्यवहार करत होता.