बलात्कार पीडितांवर टू फिंगर चाचणी केल्यास कडक कारवाई – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश


वेगवान नाशिक

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दशकभरापूर्वीच्या एका निर्णयात बलात्कार पीडित महिलांची टू फिंगर चाचणीला स्त्रीची मानमर्यादा आणि खासगीत्वाचे उल्लंघन ठरवले होते.तरी देखील आजही ही पद्धत सुरू असून ही दुर्दैवी बाब असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान टू फिंगर चाचणी अद्यापही सुरू असल्याचे समोर आल्यानंतर ही चाचणी यापुढे केली जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारांना देताना ही चाचणी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला आहे.

एका झटक्यात गॅस सिलिंडर एवढ्या रुपयांनी स्वस्त

तसेच याबाबत न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या पीठाने बलात्कार व हत्या प्रकरणातील एका दोषीला निर्दोष मुक्त करण्याचा झारखंड उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करताना गुन्हेगाराला दोषी ठरवण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. कारण पीडित महिलांच्या गुप्तांगाची तपासणी त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी असून बलात्कारामुळे त्यांना आधीच धक्का बसलेला असतो. त्यात या चाचणीमुळे त्यांना पुन्हा धक्का बसतो.

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; शिंदे गटातील या मंत्र्याचं मोठं विधान

त्यानंतर न्यायालयाने यावर केंद्र व राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना याबाबत अनेक निर्देश जारी करून पोलीस महासंचालक आणि आरोग्य सचिवांनाही टू फिंगर चाचणी केली जाणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमातून या चाचणीचे संदर्भ वगळण्याचे  निर्देशही कोर्टाने दिले.

इकडे गौतमी पाटीलच्या लावणीचे नृत्य, तर दुसरीकडे कौलांचा झाला भुगा…


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *