वेगवान नाशिक
नवी दिल्ली : सध्या देशातील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली असून अनेक बॅंकांना लाखो रूपयांचे दंड ठोठावले आहेत. त्यामुळे याचा सर्वात मोठा फटका वक्रांगी लिमिटेडला बसला आहे. तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वक्रांगी लिमिटेडला १.७६ कोटींचा दंड ठोठावला आहे. तर आरबीआयने याबाबत प्रसिद्धी पत्रक काढलं असून त्यात बँकेनी नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल इतर अनेक वित्तीय संस्थांना दंड ठोठावण्यात आला आहे.
कांद्याच्या भावात दुप्पटीने वाढ
दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं की बँकेने जम्मू आणि काश्मीर स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दुसरीकडे, मुंबईतील दि प्रताप को-ऑपरेटिव्ह लिमिटेडला 6 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि म्हैसूर मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडला प्रत्येकी 5-5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
एका झटक्यात गॅस सिलिंडर एवढ्या रुपयांनी स्वस्त
तर ही कारवाई रेग्युलेटरी कम्प्लायन्समधील कमतरतांवर आधारित असल्याने याचा ग्राहकांशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्या ग्राहकांसोबत कोणत्याही संस्थेने केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या वैधतेवर या कारवाईमुळे कोणताही परिणाम होणार नाही, असं रिझव्र्ह बँकेने म्हटलं आहे.
बलात्कार पीडितांवर टू फिंगर चाचणी केल्यास कडक कारवाई – सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश