वेगवान नाशिक
राज्याच्या राजकारणात काही दिवसापासून बच्चू कडू यांनी एकच वादळ उठवल आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना बच्चू कडू यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घ्यावी लागली होती. त्यातच आता बच्चू कडू यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असून, चौफेर फटकेबाजी केली आहे.
कांद्याच्या भावात दुप्पटीने वाढ
ते म्हणाले आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलं तर सोडत नाही. त्यानंतर बच्चू कडू यांनी जलीको आग केहते है म्हणत भाषणाची जोरात सुरूवात करत म्हणाले, सत्ता गेली चुलीत…आमचा पक्ष आंडूपांडूचा पक्ष नाही, असं म्हणाले.
त्यानंतर कडू यांनी शरद पवारांनी 2014 ला भाजपला पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांची गरज होती. आज जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंगतीत आहे, असं म्हणत त्यांनी खोचक टीका केली आहे. तसेच प्रहारचा वार त्यांना सोसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. दरम्यान, आम्ही उगाच गुवाहटीला गेलो नाही. यावेळी माफ करतो यापुढे करणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिला.
एका झटक्यात गॅस सिलिंडर एवढ्या रुपयांनी स्वस्त