वेगवान नाशिक
नवी दिल्ली : तुम्ही जर लवकरच निवृत्त होणार असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सरकारने निवृत्त होणा-या कर्मचा-यांच्या एका महत्वाच्या नियमात बदल केला असून हा बदल पीएफशी संबंधीत आहे. निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयानुसार पीएफ योजना 1995 नुसार लाभ दिला जाणार आहे. तसेच हा निर्णय सरकारकडून घेण्यात आल्यामुळे निवृत्तीच्या आधी सहा महिन्यांच्या काळात कधीही पीएफचे पैसे काढता येऊ शकणार आहेत.
कांद्याच्या भावात दुप्पटीने वाढ
याबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या वतीने एक प्रस्ताव सादर करण्यात आला असून सादर करण्यात आलेला हा प्रस्ताव अखेर केंद्र सरकारने बैठकीत मान्य केला. त्यामुळे असंख्य निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यामुळे 6 महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीत निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपल्या ईपीएश खात्यातून पैसे काढता येणं शक्य होणार आहे.
एका झटक्यात गॅस सिलिंडर एवढ्या रुपयांनी स्वस्त
दरम्यान देशात ईपीएफचा लाभ घेणारे 6 कोटीपेक्षा जास्त कर्मचारी असल्यामुळे ही संख्या येत्या काळात आणखी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावे, यासाठी धोरणात्मक पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं आहे. तसेच सीबीटीने अन्य काही प्रस्तावही या बैठकीत मांडले. त्यात 34 वर्षांपेक्षा जास्त काळ पीएफशी संबंधित असणाऱ्यांना वाढीव पेन्शल मिळावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; शिंदे गटातील या मंत्र्याचं मोठं विधान