वेगवान नाशिक
गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्याने याचा परिणाम शेती पिकांवर झाला आहे.
कांद्याचे नवीन आलेले पीक पावसात खराब झाल्याने राज्यातील कांदा (Onion) उत्पादन घटले आहे. याचा थेट परिणाम आवकीवर झाला असून नवी मुंबई (Navi Mumbai) एपीएमसी मार्केटमध्ये कांदा आवक कमी होऊ लागली आहे.
दिवसाला सव्वाशे गाड्यांची आवक आता शंभरीच्या आत आली आहे. आलेला कांदाही भिजलेला असल्याने खराब झाला आहे. यामुळे कांद्याच्या दरात (Onion Rates) दुप्पट वाढ झाली आहे.
15 रुपयांपर्यंत मिळणारा कांदा आता घाऊक मार्केटमध्ये 30 ते 32 रुपये किलोवर गेला आहे.किरकोळ मार्केटमध्ये 40 रुपयांवर कांदा पोहोचला आहे.
जानेवारीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.