अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची चर्चा; शिंदे गटातील या मंत्र्याचं मोठं विधान


वेगवान नाशिक

औरंगाबादः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु असल्यामुळे आता पुन्हा एकदा चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगण्याची शक्यता आहे.

इकडे गौतमी पाटीलच्या लावणीचे नृत्य, तर दुसरीकडे कौलांचा झाला भुगा…

यावर आता शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केले असून अशोक चव्हाण यांचे समर्थक असलेल्या आमदारानेच आपल्याला ही माहिती दिली असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतांना अब्दुल सत्तार यांना अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला. तेव्हा सत्तार त्यावर म्हणाले चव्हाण भाजप प्रवेशाची कुजबूज सुरू असल्याचा आमदार राजूरकर यांनी सांगितले असल्याचं ते म्हणाले आहे.

फडणवीस खोटं बोलले, मविआनं आणलेल्या प्रोजेक्ट्सचं घेतलं क्रेडिट; आदित्य ठाकरेंचा आरोप

तसेच  त्यानंतर ते म्हणाले की यापूर्वी देखील मी जलील यांच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांची लोकसभा निवडणुकीत विकेट घेतली होती, तेव्हा माझा रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असून, त्यांनी सांगितले त्याची विकेट मी शंभर टक्के घेणार असं सत्तार म्हणाले.

Share Market आज शेयर मार्केट मध्ये तेजीने सुरुवात


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *