वेगवान नाशिक
मुंबई : महाराष्ट्रातून बडे प्रकल्प गुजरातला गेल्यावरुन विरोधकांनी रान पेटवल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारनं आज राज्यात काही प्रोजेक्ट आल्याची माहिती दिली. यासाठी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली.
पण त्यांचे हे दावे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी फेटाळून लावले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आलेल्या प्रोजेक्टचं क्रेडिट फडणवीसांनी घेतल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आज फडणवीस खोटं बोलले असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.