राज्यात 14 हजार 956 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. या पोलीस भरतीची अखेर तारीख ठरलीय. 1 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला वेग येणार आहे. एक नोव्हेंबरला जिल्हानिहाय जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तशा सुचना पोलीस महासंचालकाकडून राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर 3 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान अर्ज भरता येणार आहे.
यात मुंबई पोलीस दलात सर्वाधिक सहा हजार 740 पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये खुल्या प्रवर्गात 05 हजार 468 पदांचा समावेश आहे. पोलीस भरतीबाबतची सविस्तर माहिती पोलीस रिक्रूटमेंट 2022 डॉट महा आयटी डॉट ऑर्ग आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट महापोलीस डॉट गोव्ह डॉट ईन (mahapolice.gov.in) या संकेतस्थळावर मिळणार आहे. उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज भरू शकत नाही. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाणार आहे.
पाहा कुठे किती जागा?
मुंबई – 6740 जागा
लोहमार्ग मुंबई – 620 जागा
ठाणे शहर – 521 जागा
मिरा भाईंदर – 986 जागा
पुणे शहर – 720 जागा
पिंपरी चिंचवड – 216 जागा
नागपूर शहर – 308 जागा
नवी मुंबई – 204 जागा
अमरावती शहर – 20 जागा
सोलापूर शहर- 98 जागा
ठाणे ग्रामीण – 68 जागा
रायगड -272 जागा
पालघर – 211 जागा
सिंधूदुर्ग – 99 जागा
रत्नागिरी – 131 जागा
नाशिक ग्रामीण – 454 जागा
अहमदनगर – 129जागा
धुळे – 42 जागा
कोल्हापूर – 24 जागा
पुणे ग्रामीण – 579 जागा
सातारा – 145 जागा
सोलापूर ग्रामीण – 26 जागा
औरंगाबाद ग्रामीण- 39 जागा
नांदेड – 155 जागा
परभणी – 75 जागा
हिंगोली – 21 जागा
नागपूर ग्रामीण – 132 जागा
भंडारा – 61 जागा
चंद्रपूर – 194 जागा
वर्धा – 90 जागा
गडचिरोली – 348 जागा
गोंदिया – 172 जागा
अमरावती ग्रामीण – 156 जागा
अकोला – 327 जागा
बुलढाणा – 51 जागा
यवतमाळ – 244 जागा
लोहमार्ग पुणे – 124 जागा
लोहमार्ग औरंगाबाद -154 जागा
एकूण – 14956
कोणत्या प्रवर्गाला किती जागा?
अनुसूचित जाती – 1811 जागा
अनुसूचित जमाती – 1350 जागा
विमुक्त जाती (अ) – 426 जागा
भटक्या जमाती (ब) – 374 जागा
भटक्या जमाती (क) -473 जागा
भटक्या जमाती (ड) – 292 जागा
विमुक्त मागास प्रवर्ग – 292जागा
इतर मागास वर्ग – 2926 जागा
इडब्लूएस – 1544जागा
खुला – 5468 जागा जागा
एकूण – 14956