फेसबुकला ‘हे’ नाव चालतच नाही, लगेच ब्लॉक!


वेगवान

सोशल मीडिया खरोखरच आश्चर्यकारक आहे कारण कधी आणि कुठून काय व्हायरल होईल काहीच सांगता येत नाही. सध्या असं एक नाव व्हायरल होतंय ज्याचा अंदाज कुणालाच येणार नाही. काही लोक या विषयाचा आनंद घेतायत पण खरं तर हा प्रकार गंभीर आहे. हा प्रकार गंभीर त्या लोकांसाठी आहे ज्या लोकांना या समस्येतून जावं लागतंय. सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय ठरला आहे.

हे असे नाव आहे जे घेताना लोक लाजत आहेत आणि सोशल मीडियावर लिहून ब्लॉक होण्याचा धोका आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कुठेतरी घडलं आहे आणि त्या पोस्टलाही या गावाचं नाव लिहिण्यावर ब्लॉक करण्यात आलं आहे.

असं अनेक लोकांच्या बाबतीत घडलंय. इतकंच नाही तर या गावातील लोक स्वतःही या समस्येला कंटाळले आहेत.

सोशल मीडियाच्या ठरलेल्या नियमांनुसार या शब्दाचा अपशब्द म्हणून समावेश करण्यात आल्याचंही या वृत्तात सांगण्यात येत आहे.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, स्वीडन मध्ये एक गाव आहे. या गावाचं नाव कुठेही लिहिताना गावातील मुलं दहा वेळा विचार करतात. गावाचं नाव लिहिण्यास टाळाटाळ केली जातेय.

फेसबुकच्या आणि सोशल मीडियाच्या नियमांमुळे या गावातील लोकांना फेसबुक व इतर ठिकाणी आपलं गाव कोणतं आहे हे सुद्धा लिहिता येत नाही.

या गावाचं नाव फार पूर्वीच ठेवण्यात आलं होतं ही वस्तुस्थिती असली तरी आता पुन्हा एकदा त्याचं नाव सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या लोक त्याचं नाव जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या गावाचे नाव F या अक्षरापासून सुरू होतं. या अक्षरावरून सुरु होणारा एक शब्द आहे. जो सगळ्यांच्याच परिचयाचा आहे. हा शब्द वापरण्यास बंदी आहे फेसबुक हा शब्द असणाऱ्या पोस्ट ब्लॉक करतं. पण या गावातल्या लोकांची समस्या मात्र मोठी आहे.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *