वेगवान नाशिक
तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीसंदर्भात न्यायालयाचा मोठा निर्णय घेतला आहे. तुकड्यातील जमिनींच्या दस्त नोंदणीला स्थगिती देण्यात आलीय. एक-दोन गुंठे जमिनींच्या (Land) खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास बंदी घालण्यात आलीय.
औरंगाबाद खंडपीठानं हा निर्णय दिलाय. राज्यातील तुकडा बंदीचे नियम आणि परिपत्रक औरंगाबाद खंडपीठानं (Aurangabad Bench) रद्द केले होते. पण या निर्णयाविरोधात पुनराविलोकन याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतलाय.तुम्ही पाडव्याच्या मुहूर्तावर जमीन खरेदीचा विचार करत आहात मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे.
आता पुढची सुनावणी 16 नोव्हेंबरला होणार आहे.
काय आहे प्रकरण ?
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 12 जुलै 2021 रोजी तुकडेबंदी तुकडेजोड सुधारणा अधिनियमाच्या कलम-ब नुसार परिपत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार एक-दोन-तीन गुंठे जागांचं व्यवहार करताना संबंधित क्षेत्राचं रेखांकन करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी घेतल्यास दस्त नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.