Sunil Gavaskar: टीम इंडिया जिंकल्यानंतर गावस्कर मैदानात एकदम ‘कडक’ नाचले,


वेगवान नाशिक

मेलबर्न: मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) रविवारी टीम इंडियाने पाकिस्तानवर (IND vs PAK) रोमांचक विजय मिळवला. पुढची अनेक वर्ष हा विजय क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहील. शेवटच्या चेंडूवर अश्विनने (Ashwin) चौकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर दिग्गज खेळाडू, फॅन्स, अबाल वुद्ध कोणीही आपल्यावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत.

संपूर्ण स्टेडियमवर इंडिया-इंडिया

प्रत्येकाने जो जिथे होता, तिथे त्याने आपल्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं. सेलिब्रेशनचे हे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, यात सुनील गावस्करांचा डान्स सुद्धा आहे.

भारताला शेवटच्या चेंडूवर एक रन्सची गरज होती. अश्विन स्ट्राइकवर होता. त्याने विजयी धाव घेताच मेलबर्न स्टेडियमवर उपस्थित 90 हजार प्रेक्षकांनी एकच जल्लोष सुरु केला. संपूर्ण स्टेडियमवर इंडिया-इंडियाच्या घोषणा ऐकू येत होत्या. विजयाच्या या आनंदात कॉमेंटेटर सुनील गावस्करही नाचताना दिसले. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

आनंदात गावस्करांचा डान्स

सामन्यात शेवटच षटक सुरु होतं. त्यावेळी कॉमेंट्री करणारे इरफान पठान, एस श्रीकांत आणि सुनील गावस्कर बाऊंड्री लाइनवर उभे होते. भारताने विजयी धाव घेताच सुनील गावस्करांनी नाचायला सुरुवात केली. टाळ्या वाजवून ते आनंदात उड्या मारत होते. इरफान पठानही गावस्करांचा हा अवतार पाहून थक्क झाला. “एमसीजीमध्ये शानदार दृश्य पहायला मिळालं. सनी पाजी नाचण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. विराट कोहली खरच तू किंग आहेस, इंडिया-इंडिया” असं कॅप्शन इरफान पठानने या व्हिडिओला दिलय.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *